संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
स्वराज शिंदेचे यश
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नक्षत्रवाडी येथील द देशमुख इंटरनॅशनल स्कूलचा स्वराज जिजा शिंदे हा विद्यार्थी पात्र ठरला. खुला प्रवर्गातून स्वराजने 182 गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरला. आय.एम.ओ. ,आय.ई.ओ., एन.एस.ओ. या ऑलंपियाड परीक्षेतही गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल स्वराज शिंदेला मिळाले आहे.
या यशाबद्दल विश्वा फाउंडेशनचे संचालक राहुल शुक्ला,देशमुख इंटरनॅशनल स्कूलचे संचालक प्रा.दीपक देशमुख, मुख्याध्यापक प्रज्ञा देशमुख, राजश्री नेमाडे, हेमंत नेमाडे, सुरेखा शिंदे,आर्यन शिंदे, युवराज शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.