Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

प्रविण खोलंबे यांना महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 11 November 2024 11:45 AM

प्रविण खोलंबे यांना महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान

(दखनी स्वराज्य, ठाणे) - 
कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटणारे प्रतिभावान कार्य कृतीशील प्रशासक व्यक्तिमत्त्व प्रविण खोलंबे यांना यावर्षीचा महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रविण खोलंबे हे पुणे जिल्ह्यातील लोकसेवा शैक्षणिक समुहाच्या एन.एस.बी. सैनिकी निवासी शाळेमध्ये  Section Incharge  या पदावर कार्यरत आहेत. सैनिकी स्कुलमध्ये नवनवीन उपक्रम राबवत असतात. विद्यार्थांचा बौद्धिक विकास कसा करता येईल याकडे त्यांचं अधिक लक्ष असतं. विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्याचप्रमाणे त्याचं साहित्य क्षेत्रातीतही उल्लेखनीय योगदान आहे. सुमारे हजार हुन कविता लिहिल्या आहेत. विविध विषयांवरील वैचारिक लेखन केले आहे. नाशिक आकाशवाणी केंद्र व जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन त्यांच्या कवितांचं अभिवाचन केलं आहे. महाराष्टातात ६० हुन अधिक ठिकाणी कविसंमेलन मध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथुन प्रसिद्ध होणारं साप्ताहिक भगवे वादळ या वृत्तपत्राचा तिसरा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मुंबई, सुरेंद्र गावस्कर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात यावर्षीचा महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक रत्न पुरस्कार साहित्यिक प्रविण खोलंबे यांना सुप्रसिद्ध साहित्यिक राम मेस्त्री, जेष्ठ साहित्यिक मधुकर गजाकोश यांच्या हस्ते रविवार दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदान करण्यात आला.