संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पुणे जिल्हा परिषद पुणे, शिक्षण विभाग यांच्यामार्फत जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या स्पर्धेत वाबळेवाडी शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांच्या समीक्षणाचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला असून शिक्षणाधिकारी संजय नाईकडे साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सचिन बेंडभर यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर समीक्षण केले होते.
पुणे जिल्हा परिषद पुणे (शिक्षण विभाग) यांजकडून जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा 2024 /25 चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात वक्तृत्व, गीत गायन, कथाकथन, पोवाडा, स्वरचित कविता, शैक्षणिक साहित्य निर्मिती, कार्यनुभव कागद काम, फलक लेखन, 100 मीटर धावणे, निबंध स्पर्धा, पुस्तक समीक्षा, प्रश्नमंजुषा, रांगोळी, चित्रकला आणि व्हिडिओ निर्मिती अशा विविध स्पर्धांचे आयोजन पुणे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले होते.
पुस्तक समीक्षा या स्पर्धेत वाबळेवाडी शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या पुस्तकावर केलेल्या समीक्षणाचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला असून जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.