Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

पैठण तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षकांची बैठक संपन्न

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 03 October 2025 05:54 AM

पैठण तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षकांची बैठक संपन्न

दखनी स्वराज्य, पैठण :


दि.२ऑक्टोबर २०२५ गुरुवार रोजी पैठण तालुक्यात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद पदवीधर प्राथमिक शिक्षकांची बैठक जिल्हा परिषद प्रशाला,पैठण येथे संपन्न झाली.या बैठकीत पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. 
शासन निर्णय क्रमांक: वेपुर-११२५/प्र.क ०१/सेवा ९ मंत्रालय मुंबई दिनांक ०२-६-२०२५ च्या संदर्भान्वये वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ च्या अहवाला मधील प्राथमिक पदवीधर शिक्षकांना वेतन त्रुटी शासन निर्णयाप्रमाणे लागू करून वेतन निश्चिती करावी,शासन निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी करून रत्नागिरी,पुणे व इतर जिल्ह्यांप्रमाणे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील प्राथमिक पदवीधर शिक्षकांना त्याचा लाभ देण्यात यावा आणि या मागण्यांची  पूर्तता दिवाळीपूर्वी व्हावी  यासाठी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.प्रास्ताविक बाळासाहेब दगडखैर यांनी केले.
याप्रसंगी प्राथमिक पदवीधर शिक्षक संघटनेचे गंगाधर काळे,बाळासाहेब दगडखैर,संतोष पवार,सुजित साव,उदय सुलाखे,ज्ञानेश्वर वाडेकर,महादेव काटे,सुनील जोशी,राजेंद्र पठाडे,जनार्दन दराडे,सातलवार.एम.बी, मच्छिंद्र औटी,भीमराव खंडागळे,अर्जुन कराड,राजेंद्र डमाळे,रेवननाथ खेडकर,संजय जोशी यांची उपस्थिती होते. गंगाधर काळे यांनी सुत्रसंचलन केले तर सुनील जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.विजयादशमीच्या शुभेच्छा देवून बैठकीची सांगता करण्यात आली.