संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी पैठण तालुक्यातील लिमगाव येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी नामदार रामदासजी आठवले यांच्याकडे केली असता सरकार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सर्वांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे असे आश्वासन दिले..
यावेळी सोबत महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मिलिंद अण्णा शेळके, बाळकृष्ण इंगळे, सुनील आडसुल, पैठण तालुका अध्यक्ष जगन्नाथ साळवे, कृष्णा वाहुळ, भारत थोटे, शिवाजी
वाहुळ, मुकेश साळवे, राहुल पहिलवान, परविन खडके, गौरव साळवे इत्यादी उपस्थित होते.