संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पैठण दि.३ आॕक्टोबर २०२५ रोजी ऐतिहासिक पैठण शहरात तालुक्यातील बंजारा समाजाचा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नियोजन सकल बंजारा समाज पैठण तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते. प्रथमतः नाथसागर रोडवरील कावसनकर स्टेडीयमवर सकाळपासून समाज बांधवांची महिलासह पारंपारिक वेशभुषेत आगमन झाले. मोर्चाचा उद्देश सकल बंजारा समाजाचा अनुसुचित जमातीचे आरक्षण देण्यात यावी. ही मागणी जोरदारपणे करण्यात आली. अलिकडेच आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या लढ्यानुसार मराठवाड्यातील सकल मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण लागु केल्याचे आदेश काढाले. त्याबद्दल समाजाच्या वतीने शासनाचे अभिनंदन करण्यात आले. ज्याप्रमाणे मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातुन आरक्षण हैद्राबाद गॕझेटनुसार देण्यात आले. त्याच गॕझेटच्या नोंदीनुसार बंजारा समाजाची नोंद आदिवासी म्हणून नोंदवलेली आहे. निजामाच्या अधिपत्याखाली असलेल्या जिल्ह्यापैकी जे जिल्हा कर्नाटकात गेले. ते त्या राज्यात अनुसुचित जमाती संवर्गात आहे. मात्र मराठवाड्यातील तत्कालीन पाच जिल्हे सध्याचे आठ तालुके भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्रात समावेश करण्यात आला. हे पाच जिल्हे आणि विदर्भातील ज्या जिल्ह्याचा महाराष्ट्त समावेश झाला. येथील बंजारा समाज एस टी आरक्षणापासून वंचित आहे. तेव्हा हैद्राबाद गॕझेटीयरनुसार सकल बंजारा हामाजाचा अनुसूचीत जमाची संवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढण्यात आला. कावसनकर स्टेडीयम बंजारा गीताच्या संगीताने मंत्रमुग्ध झाले. ध्वनीक्षेपकावरुन सर्वांना सूचना दिल्या जात होत्या. सर्वांनी शिस्तीत रहावे. अशा सूचना दिल्या जात होत्या. दुपारी एक वाजता कावसनकर स्टेडीयमवरुन फेरी निघाली. तेव्हा रस्त्यावरील रहदारी थबकली होती. पारंपारिक पेहरावातील महिला आणि तिजची परडी डोक्यावर घेऊन तालबद्ध नृत्य करणाऱ्या मुली सर्वांचे लक्ष वेधुन घेत होत्या. संत सेवालाल महाराजांच्या भूमिकेत काही तरुण घोड्यावर स्वार झालेले होते. संत सेवालाल महाराज की जय, वसंतराव नाईक साहेबांचा विजय असो. आरक्षण आमच्या हक्काचं। नाही कोणाच्या बापाचं। अशा अनेक घोषणांनी परिसर दुमदुमले. भारतीय घटनेचे शिल्पकार डाॕ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. बसस्थानकाजवळुन मुख्य मार्गावरुन रॕली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली. तेथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्राचार्य देविदास राठोड यांनी समुदायाला संबोधित केले, तर आदर्श सरपंच मोरेश्वर राठोड यांनी प्रास्ताविक केले. शिवदास राठोड यांच्या टीमने बंजारा भजन गायन केले. तर मुलींनी दिवाळीचे वेगळेपण मेरा गीत गाऊन केले. आणि महिलांनी तिज व होळी आणि दिवाळीच्या मेरा गीतातुन समाजाचे वेगळेपण अधोरेखित करत आरक्षणाची मागणी केली. जीवन राठोड आणि गोरखनाथ राठोड यांनी सांस्कृतिक कार्यक्रमास सहकार्य केले. महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून पैठणच्या तहसीलदार मा. श्रीमती ज्योतीताई पवार मॕडम यांनी समाजाचे निवेदन कुमारिका मुलींच्या हस्ते स्विकारले. समाजाच्या वतीने सदर निवेदन आजच शासनाला दाखल करण्याची मागणी केली. यावेळी मॕडमने मोर्चाला तसे आश्वासन दिले. या मोर्चाला उद्देशुन कु अपर्णा चव्हाण, सचिन चव्हाण गुरु अॕकॕडेमी, शाक्तीमान राठोड, विशाल राठोड, डाॕ कृष्णा राठोड यांची भाषणे झाली. तर विजय चव्हाण बिडकीन यांनी आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर रोडवर समाजाच्या मोर्चाचे बैठकीत रुपांतर झाले. हा कार्यक्रम दोन तास चालु होता. पोहरादेवी पीठाचे महंत धर्मगुरु जितेंद्र महाराज यांनी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणाची मागणी १९६१ पासून करण्यात येत आहे. त्यात सातत्य असायला पाहिजे. सकल बंजारा समाज जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे १४ आॕक्टोबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर विभागीय मोर्चाचे आयोजन कालेले आहे. तेव्हा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चाला येण्याचे आवाहन वसंतराव नाईक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तात्याराव चव्हाण, गणेश राठोड, कैलास चव्हाण, गोरखनाथ राठोड, अनिकेत राठोड, अशोक राठोड, प्रा आशिष राठोड यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच योगेश्वर राठोड, प्राचार्य देविदास राठोड, विजय चव्हाण, बाजीराव राठोड, मांगीलाल पवार, नामदेव चव्हाण, नितीन राठोड, संजय पवार, विनोद आडे, जीवन राठोड, विशाल राठोड, पवन राठोड, ओमकार राठोड, कुलदीप पवार, योगेश चव्हाण, वैभव जाधव, रामेश्वर राठोड, आकाश चव्हाण, अविनाश जाधव, बाळु राठोड, सचिन चव्हाण, अर्जुन राठोड, शक्तिमान राठोड, सचिन जाधव, अक्षय राठोड यांनी तांड्यातांड्याला भेटी देवुन मोर्चाचे नियोजन केले होते.