संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पत्रकार मकसूद शेख आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
दै.दखनी स्वराज/ रमेश नेटके
: गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील पत्रकार मकसूद शेख यांना शनिवारी सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या आठव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातून आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या आठव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि.15 शनिवारी मोरे चौक एमआयडीसी वाळुज येथील मसिया हॉलमध्ये पत्रकार, डॉक्टर, वकील, कला, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पुरस्कार प्रमाणपत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक राजूरकर, अभिनेत्री विदुला बाविस्कर, कॅप्टन रुचिका जैनसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ.संकपाळ एम.डी. बाबा हिंदुस्तानी फुलंब्री यांनी केले. सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक डी.पी. वाघ यांनी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.