Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

प्रा.विठ्ठल बरसमवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

प्रा.विठ्ठल बरसमवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

----------------------------------------------

( दखनी स्वराज्य, मुखेड प्रतिनिधी ) - मुखेड तालुक्यातील खैरकावाडी येथील भूमिपुत्र साहित्यिक प्रा. विठ्ठल गणपतराव बरसमवाड यांना नुकताच ध्येय उद्योग समूह अहमदनगर तर्फे आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार मा.बबन पोतदार ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार, दिग्दर्शक तसेच युवा ध्येय समूहाचे संस्थापक, लहानु निवृत्ती सदगीर, आकाशवाणी अ,नगरचे प्रमुख श्री राजेंद्र दासरी, आदर्श प्रा.आदिनाथ अन्नदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान केला आहे.

या अगोदर त्यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य संस्थेच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारणीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली होती. आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक कार्याची ही पावती आहे. ते विठूमाऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून, त्यांनी पर्यावरण, वृक्षसंवर्धन, झाडे लावा झाडे जगवा, सामाजिक वनीकरण, राष्ट्रीय हरित सेना यासारखे अनेक उपक्रम विठूमाऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवितात ,दरवर्षी गुणवंत विद्यार्थी, सेवाभावी,सेवानिवृत्त कर्मचारी,माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती, जेष्ठ महिला-पुरुष यांचा ते विशेष दिनाचे औचित्य साधून सन्मान करून त्यांना जीवन जगण्याचे बळ देतात. ते वीस वर्षापासून मराठी व इतिहास विषयाचे अध्यापन करत असून आजतागायत त्यांचे आठ ग्रंथ व वर्तमानपत्रातून सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक विषयावर 283 लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या *इतिहासातील हिरे माणके, विठूमाऊली, क्रांतिरत्ने* या साहित्य कृतीला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. दीनदुबळे व दिव्यांगाना सोबत घेऊन चालणे, परोपकार वृत्ती ठेवणे, थोरांचा आदर करणें, हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत या सर्व कार्याची दखल घेऊन 10 जुलै रोजी *स्नेहालय रेडिओ एफ,एम, 90.4 अहमदनगर आकाशवाणी* येथे विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.त्यामुळे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष. मा. रामचंद्रजी दरे साहेब व सर्व पदाधिकारी, आदर्श माता श्रीमती लक्ष्मीबाई बरसमवाड,धर्मपत्नी लेखिका सौ.कल्याणी बरसमवाड, उपाध्यक्ष मोगलाजी बरसमवाड प्राचार्य. डॉ.धोंडिराम वाडकर, डॉ.दिलीप पुंडे, डॉ.रामकृष्ण बदने, कवी लक्ष्मण मलगिरवार, गुरुवर्य श्री विठ्ठल रावीकर , ह,भ,प नराशाम महाराज, डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, सर्व संपादक,पत्रकार बंधू, विठूमाऊली प्रतिष्ठानचे सदस्य व पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.