Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

राजाबजार जैन मंदिरात चारित्र चव्रâवर्ती शांतीसागरजी महाराज यांची 69 वी पुण्यतिथी साजरी

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

राजाबजार जैन मंदिरात चारित्र चव्रâवर्ती शांतीसागरजी महाराज यांची 69 वी पुण्यतिथी साजरी   

दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर - श्री.1008 खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर येथे दिगंबर जैन समाजाचे महान संत प्रथमाचार्य चारित्र चव्रâवर्ती शांतीसागरजी महाराज यांची 67 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सर्व प्रथम सकाळी आचार्य विरागसागरजी महाराज यांच्या संघातल्या आर्यिका विकुंदनश्री माताजी व क्षुल्लिका विजीताश्री माताजी यांचे आज अरिहंतनगर जैन मंदिरा पासुन राजाबजार जैन मंदिरात आगमन झाले. यावेळी पंचायतच्या वतीने पादपक्षालन करण्यात आले. तदनंतर माताजीच्या सानिध्यात भगवान शांतीनाथांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. तसेच यावेळी चारित्र चक्रवर्ती शांतीसागरजी महाराज यांच्या प्रतिमेचा अभिषेक करण्यात आला. यामध्ये श्रीमती.ताराबाई हिराचंदजी कासलीवाल, विनोद दिलीप अ‍ॅड.अनिल श्रेणीक कासलीवाल परिवार यांच्या वतीने आचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या प्रतिमेवर अभिषेक करण्यात आला. यावेळी कार्यकमाचे प्रास्ताविक पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी यांनी केले. 

यावेळी संपुर्ण अभिषेक हा नमोकार भक्ती मंडळाच्या साग्र संगीतामध्ये करण्यात आला. यावेळी पंचायत व समाज बांधवांच्या वतीने आचार्य शांतीसागरजी महाराजांच्या फोटोला पुष्पहार मार्ल्यापन करण्यात आले. यावेळी आर्यिका विकुंदनश्री माताजी यांनी आचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या जीवनावर उदबोधन करतांना सांगीतले की, कुंथलगिरी सिध्दक्षेत्रावर आचार्यश्रीची 1955 मध्ये समाधीमरण झाले. त्यांचे 36 दिवस सल्लेगना व्रत घेतले होते. त्यांच्या वडिलांचे नाव भिमगोंडा होते तर त्यांच्या आईचे नाव सत्यवती होते. तसेच ते गावाचे पाटील होते. आचार्यश्रीचे कर्नाटक आंध्रप्रदेश महाराष्ट्र, कर्नाटक, उत्त्तरप्रदेश, शिखरजी, बिहार आदी ठिकाणाहुन हजारो किलो मिटर ची पदयात्रा आचार्यश्रींनी केली होती. तसेच यावेळी पंचायत चे विश्श्वस्थ यतीन ठोले, जे बी. पाटील सर, संतोष बाकलीवाल आदींनी आचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यकम यशस्वी करण्यासाठी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतचे विश्श्वस्थ मंडळाने परिश्रम घेतले. कार्यकमाचे सुत्रसंचालन महामंत्री प्रकाश अजमेरा यांनी केले. कार्यकमासाठी अरिहंतनगर, बालाजीनगर, चितामणी कॉलनी, हडको, सिडको आदी ठिकाणाहुन शेडको भक्त उपस्थीत होते. अशी माहीती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यांनी दिली