Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचा विद्यार्थी कु.हिमांशू ठाकरे यांची महाराष्ट्र खोखो संघात निवड

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचा विद्यार्थी कु.हिमांशू ठाकरे यांची महाराष्ट्र खोखो संघात निवड


(दै.दखनी स्वराज्य वृत्तसंस्था छ.संभाजी नगर)

जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था संचालित राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी खोखो खेळाडू कु.हिमांशू ठाकरे याची राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या किशोर संघात नुकतीच निवड झाली.

धाराशिव येथे महाराष्ट्र खोखो असोसिएशन तर्फे झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय खोखो स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली, त्यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेचा खो खो खेळाडू कु.हिमांशू ठाकरे याची निवड करण्यात आली.

झारखंड येथे दि. 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत होणाऱ्या 34व्या किशोर किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा किशोर किशोरी संघ सहभागी होणार आहे. सदर स्पर्धेसाठी संभाजीनगर जिल्ह्यातून सैनिकी शाळेचा विद्यार्थी हिमांशू ठाकरे याची निवड करण्यात आली. कु.हिमांशू ठाकरे सह संपूर्ण महाराष्ट्राचा संघ दि.19 सप्टेंबर पासून सदर राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबई येथे होणाऱ्या कॅम्पमध्ये सराव करणार आहेत. हिमांशू ठाकरे याने मागील वर्षी पालघर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत संभाजीनगर संघामध्ये खेळत चमकदार कामगिरी केली होती. हिमांशू ठाकरे सैनिकी शाळेकडून विविध खो-खो स्पर्धेत सहभागी होत उत्कृष्ट खेळ खेळत आहे.

कु.हिमांशू ठाकरे याची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल त्याचे जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, शिवसेना नेते मा.खासदार आदरणीय चंद्रकांत खैरे साहेब, संस्थेचे सचिव जयप्रकाशजी गुदगे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शालेय समिती अध्यक्ष सचिन खैरे, शाळेचे प्राचार्य ऋषिकेश पाटील यांच्यासह महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे खजिनदार अॅड.गोविंदजी शर्मा, जिल्हा खोखो असोसिएशनचे अध्यक्ष समीर मुळे, सचिव विकास सूर्यवंशी तसेच सैनिकी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.