Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

रियांश जगताप यास सायन्स ओलिंपियाड गोल्ड मेडल

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 21 March 2025 10:05 PM

रियांश जगताप यास सायन्स ओलिंपियाड गोल्ड मेडल

दखनी स्वराज्य, अकलूज : 

येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख यांचा पुणे येथील एस.पी.एम. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकणारा नातू व डॉ.चंद्रलेखा आणि
डॉ. गौरीहर जगताप यांचे चिरंजीव रियांश गौरीहर जगताप यांने सायन्स ओलंपियाड फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या सायन्स ओलंपियाड परीक्षेमध्ये 40 पैकी 34 मार्क मिळवून शाळेमध्ये प्रथम क्रमांक, पुणे विभागात 31 वा क्रमांक व आंतरराष्ट्रीय स्तरावर 39 वा क्रमांक मिळवून विशेष नैपुण्य मिळवून सुवर्णपदक  (गोल्ड मेडल) प्राप्त केल्याबद्दल त्याचे व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचे तसेच शिक्षकांचे  हार्दिक अभिनंदन केले जात आहे.
           यापूर्वी ही 2022- 23 मध्ये त्याने सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन, नवी दिल्ली त्यांचे सायबर ऑलिंपियाड गोल्ड मेडल आणि 2023-24 मध्ये सोशल सायन्स गोल्डमेडल तर  2024-25 मध्ये  सायन्स तसेच कॉम्प्युटर सायन्स मध्ये ही गोल्ड मेडल पटकावले आहे हे विशेष! त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.