Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

रयत शेतकरी संघटनेच्या वतीने नेवासा विधानसभेसाठी रामदास चव्हाण

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 10 October 2024 07:59 AM

रयत शेतकरी संघटने तर्फे नेवासा विधानसभेसाठी रामदास चव्हाण


(दै.दखनी स्वराज्य /नेवासा)


सध्या विधानसभा निवडणुका या तोंडावर आलेले आहेत नेवासा मतदारसंघातील निवडणुकीसाठी रयत शेतकरी संघटनेचे विश्वसनीय पदाधिकारी रामदास पाटील चव्हाण यांना उमेदवारी निश्चित होणार असल्याने येथील विधानसभा मतदारसंघातील आजी माझी विधानसभा उमेदवारांचे धाबे दणानलेले असून श्री रामदास पाटील चव्हाण हे रयत शेतकरी संघटनेचे नेवासा मतदार संघाचे एक विश्वसनीय पदाधिकारी मानले जात आहे त्यांच्या या जवळपास निश्चित उमेदवारीला शेतकरी व्यापारी तरुण वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दुसरीकडे आजी माझी विधानसभा उमेदवार यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे रामदास चव्हाण हे तरुण शेतकरी आणि गरीबीची जाण असणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचे ध्येय आणि धोरण शेतकरी आणि तरुण यांच्यासाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या या कार्याला बघता  रयत शेतकरी संघटनेला त्यांच्या स्वरूपाने एक नव तरुण चैतन्य असणारे व्यक्तिमत्त्व मिळाले या मतदारसंघात श्री रामदास पाटील चव्हाण यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा येथील मतदार संघात होत आहे.

रामदास चव्हाण
रयत शेतकरी संघटना नेवासा माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी आणि तरुण वर्ग यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला मी भविष्यामध्ये तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही या माध्यमातून मी आज देत आहे, माझे कार्य बघता माझा पक्ष रयत शेतकरी संघटनेने जो विश्वास या मतदारसंघात माझ्यावर दाखवलेला आहे. या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. सदैव शेतकरी आणि तरुण वर्ग यांच्यासाठी काम करेल, अशी ग्वाही या माध्यमातून मी आज देत आहे. सर्व शेतकरी बांधव तरुण बांधव आणि माझ्या रयत शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना मी धन्यवाद देतो.