संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल आडगाव मध्ये आजी व माजी विद्यार्थ्यांनी "वृक्षदिंडी " काढत केली जनजागृती.
दखनी स्वराज्य, नाशिक - रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल आडगाव याठिकाणी विद्यालयामध्ये वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या १९९९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात १२५ रोपे देत या सर्व झाडांची लागवड त्यांनी स्वतः करत नवीन पिढीसमोर एक आदर्श घालून दिला. विद्यालयाच्या कनिष्ठ लेखनिक श्रीम. विद्या झुरुडे मॅडम यांनी ही ५० झाडांची रोपे विद्यालयास भेट दिली. गावामध्ये जनजागृती फेरी काढण्यात आली. यामध्ये १९९९ च्या बॅचच्या विद्यार्थ्यानी ही सहभाग घेतला. वृक्षदिंडी वाजत गाजत गावामध्ये नेण्यात आली . श्री .उमेश शिंदे यांच्या घरी वृक्षदिंडीचे स्वागत करण्यात आले. त्याठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गावातील श्री मल्हारी अण्णा मते, श्री.माणिकभाऊ शिंदे, श्री.एकनाथ तपकिरे, संतोष हळदे, बापु मोरे, कैलास शिंदे, भाऊसाहेब मते तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. सामाजिक संदेश देणारे अनेक फलक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये दिसत होते.
गावातून वृक्षदिंडीची मिरवणूक झाडे लावा, झाडे जगवा ' आदी घोषणा देत पुन्हा विद्यालयामध्ये परत आली. विठ्ठल- रुख्मीणी, महाराष्ट्रातील थोर संत अशा वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या. विद्यालयातील सांस्कृतिक विभागामार्फत गावामध्ये अनेक टाळ मृदंगाच्या साथीने अभंग सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे गावकऱ्यांनी कौतुक करत शाळेत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे ही कौतुक केले. यानंतर शाळेमध्ये रिंगण सोहळा पार पडला. विद्यालयात वृक्षारोपणानंतर सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सभेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश शिंदे हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे भाई पुंजा माळोदे जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे महत्व समजून सांगत झाडांची निगा राखण्याबाबत मुलांना आवाहन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापिका रोहीणी भवर यांनी १९९९ च्या बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करत त्यांनी सुरू केलेल्या या चळवळीचे कौतुक केले. याप्रसंगी डॉ.संदीप देशमुख यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आहाराविषयी माहिती देत आजच्या काळात झाडांचे महत्व किती अनन्य साधारण आहे हे समजून सांगितले.बशाळेला १९९९ माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या १२५ झाडांचे शाळेच्या वतीने संवर्धन करण्याबाबत मा .मुख्याध्यापिका सौ.भवर मॅडम यांनी आश्र्वासित केले. उमेश शिंदे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून शाळेतील उपक्रमाबद्दल कौतुक केले. भविष्यात पर्यावरण चळवळ कायम चालत राहील असे त्यांनी विशद केले. विद्यार्थी भाषण कु.प्रतिक्षा पवार, कु .निकीता मोरे , कु.श्रेया उखार्डे मुलांनी झाडांचे महत्व विशद करत आपले विचार व्यक्त केलेत . या कार्यक्रमाचे नियोजन अतुल माळेकर व जनार्दन धूम यांनी केले .वृक्षदिंडी सजावट, वेषभूषा व फलखलेखन हेमराज नागपूरे, ढोलताशा व लेझीम सादरीकरण नियोजन उर्मीला भोये, रेखा गवळी यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी प्र. पर्यवेक्षक कैलास बागले त्याच बरोबर १९९९ च्या बॅचचे विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. संदीप देशमुख, तुकाराम लभडे, बापू मोरे, कैलास शिंदे, भाऊसाहेब मते, ओमकार देशमुख , प्रकाश रिकामे, संदीप नवले, शहानवाज मणियार, नाशिक तेज या वृत्त वाहिनीचे संपादक सुदाम हळदे ,अशोक माळोदे, संतोष हिंदे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले.१९९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यानी दिवसभर शाळेत थांबून सर्व रोपांची लागवड आज विद्यालयात केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक फुलमाळी संतोष यांनी केले.सर्व उपस्थितांचे आभार पाटील जगदीश यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.