संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) -
श्री सरस्वती भुवन प्रशालेत आनंददायी शनिवार शिक्षण उपक्रमा अंतर्गत स्काऊट - गाईड गाठींचे प्रात्यक्षिक व सराव घेण्यात आला. स्काऊट गाईड प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रेजिमेंटल हायस्कूलचे स्काऊटर श्री अनंत पाटील यांनी विविध गाठींचे प्रात्यक्षिके करून दाखवले. याप्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र कोठावदे, पर्यवेक्षक श्री अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृतीयुक्त गीतांचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला याप्रसंगी शाळेतील स्काऊटर श्री विनोद सिनकर, विजय पाताळयंत्री, संदीप घुगे, युवराज चित्ते तसेच गाईडर श्रीमती छाया महाजन, अंजली कोलते अंजली, क्रीडा शिक्षक चंद्रशेखर पाटील व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शुभांगी पांगरकर यांनी केले.