संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
अग्रसेन टाइम्सचे कार्यकारी संपादक श्री. सचिन अरुणकुमार मुंदडा यांची लाडकी लेक अर्णा ही तिने गायलेल्या ‘महाराष्ट्रगीता' मुळे चर्चेत आलेली आहे. अतिशय चुणचूणीत असलेली कुमारी अर्णा छत्रपती संभाजीनगर शहरातील अग्रसेन विद्या मंदिर या शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत आहे. एक मे या महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून ‘तिने गर्जा जयजयकार महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र गीत पा' करून ते तालबद्ध पद्धतीने गाऊन दाखवले. उत्कृष्टपणे गाऊन दाखवलेले हे गीत ऐकून उपस्थित सर्वच मंडळी मंत्रमुग्ध झाली. अगदीच वय वर्ष सहा असलेल्या या छकुलीनं अगदी हावभावासहीत अप्रतिम पणे हे गीत बोबड्या बोलीत सादर केले, त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक यु ट्युब आणि लोकल चॅनेल वाल्यांनी तिचा शोध घेऊन जे हे गीत समाज माध्यमांमध्ये व्हायरल केलेले आहे. त्यामुळे सर्वात स्थळातून छोट्या आणि नटखट अशा अर्णा वर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
अर्णाचे वडील कार्यकारी संपादक आहेत. तिची आत्या शिक्षिका आहे. सार्वजनिक जीवनात वावरणारे मुख्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अरुणकुमार मुंदडा यांची अर्णा ही लाडकी नात आहे. मुंदडा कुटुंबातील सुसंस्कृत आणि प्रगल्भ वातावरणामुळे अर्णाचे व्यक्तिमत्वही या वातावरणाला अनुकूल असेच घडते आहे. मागील वर्षी अर्णाचा मोठा भाऊ अर्णव याचे एक पुस्तक दिल्ली येथील एका सुप्रसिध्द प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे.