संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
सकल मराठा समाज व क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलनचा इशारा
(दै.दखनी स्वराज्य, महेंद्र नरके) : सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पैठण तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले. निवेदनकर्त्यांनी नायब तहसीलदार बनसोड साहेब यांना निवेदन दिले. निवेदन देताना एक मराठा कोटी मराठा, मनोज पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 17/09/2024 रोजी मराठा योध्दा मा.श्री.मनोज पाटील जरांगे हे मराठा आरक्षण संदर्भात आमरण उपोषणास बसले आहेत. सध्या त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत चालली आहे. शासनाने याबाबत तत्पर दखल घेत मागणी संदर्भात पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने पैठण सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन कुठलीही पुर्वसूचना न देता करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावेळी
साईनाथ पा. कर्डिले, पवन शिसोदे, अनिल राऊत, रोहन भुमरे, अर्जुन खरात, आशिष औटे, प्रशांत देशमुख, गणेश आल्हाट, महादेव वडेकर, महेंद्र नरके, भगवान कबाडी, दत्ता निवारे, पिंटू आरगडे, भागवत पठाडे, अंकुश काळे, संदीप मापारी, सुदर्शन पल्लोड, गोविंद बावणे, अविनाश तांदळे, कल्याणराव गोरे, रामेश्वर गवांदे यांची उपस्थिती होती.