संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
संजय बनसोडे यांची कवी विलास सिंदगीकर यांच्या घरी सदिच्छा भेट
दखनी स्वराज्य, जळकोट -
दि.4 ऑगस्ट 2024, रविवार रोजी मा.ना.श्री.संजय बनसोडे, (कॅबिनेट मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे, महाराष्ट्र राज्य) यांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य विलास सिंदगीकर यांच्या फकिरा या घरी भेट दिली. विलास सिंदगीकर परिवाराच्या वतीने मंत्री महोदयाचा शॉल, पुष्पहार आणि राज्य शासनाचा स्व.यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कर प्राप्त "बाजार" हा कथासंग्रह भेट देऊन सुहृदयी सत्कार करण्यात आला. यावेळी जळकोट नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष तथा लातूर जि.प.परिषदेचे माजी कृषी सभापती मन्मथअप्पा किडे, जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य चंदन पाटील, जळकोटचे युवा नेतृत्व गोविंद भ्रम्हणा, निराधार समिती जळकोटचे अध्यक्ष विनायक जाधव, दै.सकाळचे तालुका प्रतिनिधी प्रा.विवेक पोतदार, कवी प्रा.चंद्रकांत मोरे, प्रा.सी.एम. कांबळे, युवा नेते गजानन दळवे, सरपंच श्रीमती बायनाबाई कांबळे, ग्रां.पं.सदस्य नसरोद्दीन पिंजारी, बामणे, भाऊराव सिंदगीकर, नामदेव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री महोदयांनी गावकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. गृहभेट दौऱ्यात नसतानाही विलास सिंदगीकर यांच्या घरी सुहृदयी भेट दिल्यानंतर ते रेल्वेने उदगीरहून मुंबईकडे रवाना झाले.