संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
संस्कृत विषयात प्रतिभा धोंडकर यांना पीएच.डी.
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संस्कृत विषयात प्रा. प्रतिभा भागाजी धोंडकर यांना पीएच.डी. जाहीर केली. त्यांनी डॉ. मीनल श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनाने 'कौटिलीय अर्थशास्त्रातील गुप्तहेर व्यवस्था व त्याचे भारतीय राजनीतीच्या संदर्भात चिकित्सक अध्ययन' या विषयावर शोधप्रबंध सादर केला.
डॉ.सौ. इं.भा. पा. महिला महाविद्यालयात त्या संस्कृत विषयाच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. सुनिता बाजपाई, संस्कृत विभाग प्रमुख डॉ. मीनल श्रीगिरीवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संस्कृत विभाग प्रमुख डॉ. क्रांती व्यवहारे तसेच संस्थेच्या सन्माननीय सदस्यांनी प्रा. प्रतिभा धोंडकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे.