Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्रातर्फे तुका म्हणे पुरस्काराचे आयोजन. कन्नड : शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाचा उपक्रम

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्रातर्फे

तुका म्हणे पुरस्काराचे आयोजन.


कन्नड : शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाचा उपक्रम


दखनी स्वराज्य, कन्नड : येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग व भाषा संशोधन केंद्र अंतर्गत कार्यरत असलेल्या संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने संत तुकाराम व्याख्यानमाला, संत तुकाराम महाराज प्रमाणपत्र अभ्यासक्रम, चर्चासत्र, निबंध लेखन स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात येतात. या वर्षा पासून अध्यासनातर्फे तुका म्हणे पुरस्कार देण्यात येणार आहे . नुकतीच अध्यासन केंद्राची बैठक प्राचार्य डॉ. विजय भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . (ता. ९ ) त्यात हा निर्णय घेण्यात आला.

संत साहित्य व आधुनिक साहित्यात संताच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकणारे साहित्य, संशोधन व समीक्षापर लेखन, संत साहित्याचा प्रचार व प्रसार करणे, संत साहित्याच्या अभ्यासाला गती देणे. संत साहित्य विषयक कार्य करणाऱ्या व्यक्ती, कीर्तनकार, वारकरी संस्था यांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा हा पुरस्काराचा उद्देश आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र , शॉल व श्रीफळ आणि ५००० रू. रोख रक्कम (पाच हजार ) असे पुरस्काराचे स्वरूप आहे. एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.जानेवारी २०२ २ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत संत साहित्यावर आधारीत प्रकाशित पुस्तके, संशोधनपर व समीक्षात्मक ग्रंथ, चरित्र, विशेषांक, संपादने, आदी साहित्य दि. १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत पुस्तकाच्या दोन प्रती, अल्पपरिचय, पासपोर्ट फोटोसह डॉ. शिवाजी हुसे , प्रमुख ,मराठी विभाग व भाषा संशोधन केंद्र, संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र , शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कन्नड ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर - ४३ ११ ०३ या पत्यावर पाठवून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. विजय भोसले, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब मगर, मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवाजी हुसे, डॉ. रामचंद्र झाडे यांनी केले आहे.