संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
सप्टेंबर 2024 मधे होत असलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये निवडलेल्या खेळाडूंचे किट देवून स्वागत
दखनी स्वराज्य, पान रांजणगाव - छत्रपती संभाजी विद्यालय पान रांजणगाव (खुरी) येथे निवड चाचणी घेण्यात आली. सप्टेंबर 2024 मधे पैठण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन वडवळी वाघाडी येथे करण्यात आले आहे. तालुका स्तरावरील कबड्डी स्पर्धा मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याचे स्वागत आणि त्यांना कबड्डी खेळण्यासाठी लागणारे किट गावकऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. रांजणगाव खुरी येथील छत्रपती संभाजी विद्यालय मध्ये शाळेतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. छत्रपती संभाजी विद्यालय संघासाठी मारुती नाना पगारे यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्रेय चव्हाण भारतीय वायुसेना मुंबई यांनी किट दिले आहेत. विशेष म्हणजे दत्तात्रय चव्हाण हे स्वतः माजी विद्यापीठ स्तरीय कबड्डी खेळाडू आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रो कबड्डी स्टार आणि भारतीय कबड्डी संघाच्या कॅम्पसाठी निवड झालेला सुनील दुबिले, विवेकानंद महाविद्यायातर्फे विद्यापीठ स्तरीय सुवर्ण पदक विजेता खेळाडू मोहम्मद चाऊस यांची विशेष उपस्थिती होती. उप शिक्षणाधिकारी कुलकर्णी साहेब, महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्य दक्ष अधिकारी भगवान मगर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य विठ्ठल शेळके यांनी विशेष मार्गदर्शन केले.
रांजणगावचे सरपंच सुरेश भिसे, उपसरपंच रंगनाथ लघाने, गणपत चव्हाण, ज्येष्ठ नागरिक माजी मुख्याध्यापक टी.जी. ढगे सर, माजी उपसरपंच पिंटू आप्पा लघाने, एकनाथ खंडागळ (माजी सैनिक), पत्रकार कल्याणराव इंदापूरे, पत्रकार विष्णू आप्पा लघाने, पत्रकार शिवाजी चव्हाण तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व कबड्डी खेळाडू शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.