संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पुण्यनगरीचे मा उपमहापौर दिलीप बराटे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे दि ३१ जानेवारी २०२५ रोजी आयोजन केले आहे.
साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १०.०० वा होणार आहे. संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा दिलीप बराटे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाॅ.धनंजय त्रिमुखे, उपप्राचार्य प्रा आशुतोष कसबेकर, स्पर्धेचे संयोजक डाॅ.राजेंद्र थोरात यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे.
वितरण समारंभास संस्कार मंदिर संस्थेचे खजिनदार मा अविनाश जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डाॅ.संदीप सांगळे, डाॅ.पाडुरंग कंद उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणे-
१) साहित्यिक कलावंत संमेलन: रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर
२)रयतेचा राजा : छत्रपती शिवाजीमहाराज
३)अभिजात मराठी...आता पुढे काय ?
४) अमृतमहोत्सवी भारतीय संविधान
५) महिला सबलीकरण ते महिला सक्षमीकरण...
६) सबसे खतरनाक होता है हमारे सपनो का मर जाना...
७) उद्योगातील रत्न - रतन टाटा
पारितोषिके-
प्रथम- ७००१ रू सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय-५००१रू सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय-३००१रू सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ -२००१रू व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ-१००१ रू व प्रमाणपत्र
महाराष्ट्रभरातील वक्तृत्व प्रेमींनी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजक डाॅ.राजेंद्र थोरात यांनी केले आहे.