संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
येथील सेवानंद महिला ग्रुप व प्रा. संगीता जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने कै. निळकंठ जाधव यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त छत्रपती शिवाजी विद्यालयाला ३० ड्युअल डेस्क देण्यात आले.
या निमित्त छत्रपती शिवाजी विद्यालयात मंगळवारी (दि.१७) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उज्वला होके पाटील या होत्या. यावेळी अंजली सोळंके, प्रा. स्नेहल पाठक, शोभा वर्मा, प्रा. संगीता जाधव, जान्हवी जाधव, सुनीता शेजुळ, जयश्री लड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. निळकंठ जाधव यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री लड्डा यांनी केले. यामध्ये त्यांनी सेवानंद महिला ग्रुपच्या वतीने आत्तापर्यंत विविध शाळांना दिलेल्या मदतीची माहिती दिली व कै. निळकंठ जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रा. स्नेहल पाठक यांनी सांगितले की, मुख्याध्यापक निळकंठ जाधव हे उपक्रमशील मुख्याध्यापक होते.आयोजकता, कल्पकता हे त्यांचे गुण होते. प्रा. संगीता जाधव यांनी कै. निळकंठ जाधव यांच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे सांगितले. मुख्याध्यापक कै. निळकंठ जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ १० वी वर्गातून प्रथम येणार्या विद्यार्थ्याला बक्षीस जाहीर केले.
. अध्यक्षीय समारोप उज्वला होके पाटील यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालासाहेब झोडगे यांनी केले. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भास्कर पारगावकर, आप्पासाहेब होके, मुरलीधर भाळशंकर, माधव घोलप, सय्यद गयास, दत्तात्रय इंगळे, मिलिंद देशपांडे, अनंत राठोड, सत्यप्रिया होके पाटील, फरजाना पठाण, स्मिता डाके, शिल्पा शिनगारे, पंकज कळसकर, तुळशीराम साळवे, शेख शहानूर, ज्ञानेश्वर पवार, दत्तात्रय पांडे, दिनकर काळे यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.