संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध श्री क्षेत्र पैठणच्या पावन भूमीत श्री संत एकनाथ महाराजांच्या 426 व्या नाथषष्ठी जलसमाधी पुण्यतिथी पर्वा निमित्ताने नाथषष्ठी सोहळा दिनांक 19 ते 22 मार्च 2025 या कालावधीत पैठण ते छत्रपती संभाजीनगर येथे दररोज अपडाऊन करणारे प्रवासी मित्र ग्रुपच्या वतीने
"चार दिवसीय विविध उपक्रमांचे" आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असुन या उपक्रमात नाथषष्ठीसाठी येणाऱ्या भाविक-भक्त व वारकरी यांच्यासाठी पाणी वाटप, फराळ वाटप, सामूहिक पसायदान पठन असे विविध उपक्रम घेण्यात आले.
या वेळी श्री छत्रपती शिवचरित्र पारायण सोहळा समितीचे प्रा. चंद्रकात भराट आणि एस टी महामंडळाचे संभाजीनगर विभाग व पैठण आगार आणि प्रवासी मित्र ग्रुप याच्या सयुक्त विद्यमाने हजारोच्या संख्येनी उपस्थित भक्तांनी विश्वशांतीसाठी पसायदानाच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
यावेळी संभाजीनगर एस.टी. महामंडळ विभागाचे विभागीय अधिकारी श्री. सचिन क्षिरसागर, पैठण आगार व्यवस्थापक गजानन मडके, वाहतूक अधिकारी राजेंद्र कोलते, विभाग नियंत्रक श्री सचिन क्षीरसागर, विभागीय वाहतूक अधिकारी श्री संतोष घाणे, पैठण आगाराचे स्थानक प्रमुख श्री महेन्द्र अरगडे, मिलिंद रोडे, प्रवासी संघटनेचे केदार मिरदे, प्रशांत आव्हाड, विजय गुंजाळ, किरण पंजावाले, अच्युत शिंदे, संजय भागवत, पांडुरंग चोरमले, सोहम मापारी, महेश मापारी, विशाल खर्गे, आबासाहेब पाचे, वैष्णव कडलग आदी उपस्थित होते. हा उपक्रम सर्व प्रवासी मित्र, चालक वाहक मित्र, एस.टी. महामंडळातील सर्व कर्मचारी वृंद, माननीय पदाधिकारी, वारकरी, पैठणकर नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.