Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

(शासनमान्य) महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विजय शेळके यांची निवड

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 03 January 2025 09:37 AM

(शासनमान्य) महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विजय शेळके यांची निवड

(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) 

जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर 2024 रोजी दरवर्षीप्रमाणे शासनमान्य संघटनेच्या जिल्हास्तरीय दिव्यांग कर्मचारी सन्मान सोहळा तसेच कार्यशाळा द्वितीय सत्रात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी व दिव्यांग कर्मचाऱ्यांचे गुणवंत पाल्य यांचा सेवागौरव व गुणगौरव पुरस्कार देऊन उपस्थित अधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला,अध्यक्षस्थानी मा.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे होते,प्रमुख पाहुणे म्हणून मा.विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.शिवाजी सूक्रे साहेब अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मा.जयश्री चव्हाण शिक्षणाधिकारी प्राथमिक,मा.सचिन क्षीरसागर विभाग निमंत्रण रा.प.म.,विभागीय अध्यक्ष आर.आर. पाटील,हे होते.
द्वितीय सत्रात जिल्ह्यातील उपस्थित राज्य,जिल्हा व तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील सर्व सदस्य एकूण 300 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हात उंचावून आवाजी मतदानाने बिनविरोध विजय शेळके यांची निवड करण्यात आली. 
त्यांचे गेल्या 19 वर्षापासून संघटन वाढीसाठीचे योगदान अत्यंत मोठे आहे व तितकेच प्रभावी सुद्धा आहे.प्रत्येकवेळी संघटनेच्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या समस्येला वाचा फोडून योग्य तो न्याय सनदशीर मार्गाने सभासदांना मिळवून दिला आहे.त्यांच्या केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना विभागीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,
राज्याध्यक्ष साईनाथ पवार, संस्थापक अध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील,राज्य सचिव ललितजी सोनवणे,राज्य कोषाध्यक्ष विलास भोतमांगे, राज्य उपाध्यक्ष महादेव शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विठाबाई भोसले, जिल्हा सचिव काटोले, यांनी तसेच सर्व तालुकाध्यक्ष व जिल्ह्यातील सर्व सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजीनगर तालुक्यातील सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार किरण थोरात यांनी मानले.