संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
घनसावंगी : घनसावंगी-महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत झालेल्या आतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. या मधून जालना जिल्ह्याला वगळण्यात आल्यामुळे शेतकर्यावर प्रचंड अन्याय झाला आहे. वास्तविक पहाता जालना जिल्हा व विशेषत:घनसावंगी तालुक्यामध्ये आतिवृष्टीमुळे शेतीचे,पशुधनाचे व अनेक ठिकाणी जिवितहानी झाल्याचे महसुल विभागाने कळवून सुध्दा शासनाने जालना जिल्हा मदती पासून वगळून जिल्ह्यावर अन्याय केला आहे.
सरकारने तात्काळ जालना जिल्ह्याला आतिवृष्टीचे आनुदान जाहीर करावे नसता लवकरच महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजीमंञी आ.राजेश टोपे व खा.संजय जाधव यांनी असंख्य शेतकरी, कार्यकर्त्यांसह जाऊन तहसीलदार, घनसावंगी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.यावेळी उपस्थित शेतकर्यानी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.