Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

शिवाजी महाविद्यालय 'रेड रिबन क्लब' तर्फे एड्स जनजागृतीपर पथनाट्य सादर

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 08 October 2024 08:48 AM

शिवाजी महाविद्यालय 'रेड रिबन क्लब' तर्फे एड्स जनजागृतीपर पथनाट्य  सादर 


(दखनी स्वराज्य, कन्नड) -

प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या आदेशान्वये इंटेन्सीफाईट आय.इ.सी.  कॅम्पियन 15 सप्टेंबर 2024 ते 15 ऑक्टोंबर 2024 दरम्यान डॉ. दयानंद मोतीपवळे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती साधना गंगावणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (डापकू), डॉ. प्रवीण पवार वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कन्नड यांच्या समन्वयातून आज 7/10/2024 रोजी शिवाजी महाविद्यालय कन्नड येथील 'रेड क्लब'च्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आयसी कॅम्पियन अंतर्गत फ्लॅश माॅब कार्यक्रमाचे बस स्टॅन्ड कन्नड आणि पिशोर नाका कन्नड या ठिकाणी एचआयव्ही /एड्स विषयी जनजागृतीपर  आयोजन करण्यात आले.  पथनाट्य सादर करण्यात 'रेड रिबन क्लब'चे विद्यार्थी पवन जाधव, गायत्री हारमोर (पथक प्रमुख), प्रगती पवार, अदनान पठाण, साहिल पठाण, धनश्री पाटे, कल्यणी सोनवणे, मयुरी पवार, कोमल काळे, जिया पटेल, जाहिद सय्यद, ओंकार शेळके या विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला.
या कार्यक्रमास शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. भोसले, उपप्राचार्य डॉ.मगर, आयक्युएसी  समन्वयक डाॅ.मातकर, डाॅ. झाडे यांचे अमूल्य सहकार्य मिळाले आणि रेड रिबन क्लबचे समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत संघई यांनी सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्याचबरोबर श्री संजय सोनवणे आयसीटीसी समुपदेशक व श्री शशिकांत गांगुर्डे आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रामीण रुग्णालय कन्नड यांनी सर्व फ्लॅश माॅब नियोजन करून कार्यक्रमचे अंमलबजावणी केली आणि सर्वसाधारण लोकांमध्ये एचआयव्ही/  एड्स विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले.