संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
शिक्षक दिनानिमित्त एकताच्या वतीने होणार राज्यस्तरीय रौप्य महोत्सवी ऑनलाईन काव्य संमेलन
दखनी स्वराज्य, शिरूर कासार (वार्ताहर) : एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित 25 वे (रौप्यमहोत्सवी) राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलन भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त दि.5 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न होणार असल्याची माहिती एकता कोअर कमिटीने दिली असून या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी परभणी येथील लेखक ह.भ.प.प्रा.डाॅ.विठ्ठल जायभाये आणि उद्घाटकपदी अंबाजोगाई येथील जेष्ठ साहित्यिक मा.राजेंद्र रापतवार यांची निवड करण्यात आल्याचे एकताच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीर केले.
फाउंडेशनच्या माध्यमातून सहा एकता मराठी राज्यस्तरीय साहित्य संमेलनांचे आयोजन, अनेकदा वृक्षारोपण, रक्तदान शिबीरे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अन्नधान्य व साडीचोळीची मदत, होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, निराधार, अनाथांना अन्नधान्याची मदत, राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा, जीवनगौरव, आदर्श शिक्षक, आदर्श सामाजिक कार्यकर्ता, आदर्श पत्रकार, आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार वितरण समारंभ, आंतरराष्ट्रीय कालाकारांची जुगलबंदी कार्यक्रम, कोजागिरी काव्य मैफिल, मातृदिन काव्य सप्ताह, उन्हाळी बाल-कुमार संस्कार शिबीर, राज्यस्तरीय व विभागीय कार्यकर्ता शिबीर आणि काव्य संमेलन, थोर महापुरुष, वंदनीय राष्ट्रीय नेते, हुतात्मे, क्रांतिकारक, दिवंगत साहित्यिक यांच्या जयंती पुण्यतिथी, शिव-चित्र व भीम-चरित्र स्पर्धा, एकता महाराष्ट्र वक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथालय लोकार्पण, पुस्तक प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम यांसारखे उपक्रम अनेक वर्षांपासून राबविण्यात येतात. गेल्या वर्षांपासून एकताच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य संमेलनांचे आयोजनही करण्यात येत असून या ऑनलाईन संमेलनातील रौप्य महोत्सवी काव्य संमेलन बुधवारी पार पडणार आहे. या संमेलनात तुळजापूर येथील साहित्यिक तथा पाठ्यक्रमातील कवी शंकर अभिमान कसबे, गझलकार श्रीराम गिरी (बीड), माजलगावच्या कवयित्री गौरी देशमुख, कवयित्री अर्चना स्वामी (अंबाजोगाई), जुन्नर येथील कवी विलास हाडवळे, कवयित्री सुरेखा कानडे (पुणे), पाटोदा जि.बीड येथील कवयित्री सुरेखा खेडकर हे निमंत्रित मान्यवर सहभागी होणार आहेत. परळी वैजीनाथ येथील कवीवर्य अनंत मुंडे हे या काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन करतील. एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे प्रवक्ता मल्हारी खेडकर यांची प्रस्तावना व एकताचे बीड जिल्हा प्रतिनिधी प्रा.महारूद्र डोंगरे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होईल.
या काव्य संमेलनाचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन एकताचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, मार्गदर्शक प्रा.डाॅ.भास्कर बडे, सचिव पत्रकार गोकुळ पवार, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, उपाध्यक्ष नितीन कैतके व मिरा दगडखैर, सहसचिव लखुळ मुळे, एकताच्या सल्लागार ॲड.भाग्यश्री ढाकणे, महिला आघाडी प्रमुख रंजना फुंदे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डाॅ.सचिन सानप, कैलास तुपे, राजेश बीडकर, माही शेख, दिपक महाले, डाॅ.शोभा सानप, रंजना डोळे, शोभा राजळे, लता बडे, हरिप्रसाद गाडेकर, पो.काॅ.ज्ञानेश्वर पोकळे, महादेव राऊत, फौजी कैलास खेडकर, महेश नागरे, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, एकता लेखक आघाडी प्रदेश सचिव दिनकर जोशी, लेखक आघाडी प्रदेश संघटक किरण भावसार, प्रदेश युवक निमंत्रक इम्रान शेख, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, विभागीय सचिव अंबादास केदार, महिला आघाडी विभागीय अध्यक्षा प्रा.डाॅ.संगीता घुगे, विभागीय संघटक पत्रकार राजा पुजारी, विभागीय युवक आघाडी संघटक ह.भ.प.सुनील महाराज केकाण, एकता पत्रकार आघाडीचे संतोष तांबे, बाळासाहेब कोठुळे, प्रशांत बाफना, बिभीषण चाटे, अशोक भांडेकर, उत्तम बोडखे, अंगद पानसंबळ, भिमराव उल्हारे, शहाबाज पठाण, सज्जन शेळके यांसह विविध जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि सभासद, कार्यकर्त्यांनी केले आहे.