संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
शिक्षक दिनी गणोरी प्रशालेचा झाला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव
▪️जि.प. प्रशासनाने केली नवोपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून निवड
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) - राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे तापडिया नाट्यगृहात नवोपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शाळा सन्मान सोहळ्यात जि.प.गणोरी प्रशालेचा सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, बुक-बुके, प्रशस्तीपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. मा. जिल्ह्याधिकारी श्री दिलीप स्वामी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना, शिक्षण उपसंचालक मा. अनिल साबळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक मा. श्रीमती जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी योजना मा. श्रीमती अरुणा भूमकर- झाडबुके, गटशिक्षणाधिकारी मा. श्रीमती क्रांती धसवाडीकर, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा. राजेंद्र महाजन यांच्या हस्ते हा सन्मान प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अनिल प्र. देशमुख, जेष्ठ शिक्षिका श्रीमती एस. डी. देशमुख, श्री एन. एन. परदेशी यांनी स्वीकारला. जिल्ह्यात जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या 2100 शाळांपैकी केंद्रनिहाय 125 शाळांचा हा गौरव करण्यात आला. यासाठी प्रशासकीय पातळीवर पाहणी करून निवड प्रक्रिया राबवली गेली होती. प्रशालेच्या या यशाकरिता सरपंच सरलाताई संतोष पाटील तांदळे, उपसरपंच राजू दादा तांदळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुनिताताई जाधव, उपाध्यक्ष श्री प्रभाकर गायकवाड यांच्यासह सदस्य श्री भास्करराव करडे, श्री कडुबा पाटील चंद्रे, श्री किशोरराव उबाळे, श्रीमती रेखाताई उबाळे, श्रीमती माधुरी जाधव, श्री तातेराव पेहेरकर, श्रीमती अफसाना शहा यांनी मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अभिनंदन केले आहे. प्रशालेच्या या कामगिरीसाठी मुख्याध्यापक अनिल प्र देशमुख याच्यासह श्रीमती सुवर्णा देशमुख, नगराजसिंह परदेशी, श्रीमती एस.डी. नाईकवाडे, श्रीमती एस.एम. बाबरेकर, सुरेश ठाकूर, रामेश्वर जाधव, राजेंद्र जगताप, श्रीमती बी.व्ही. ठाकरे, श्रीमती एस.एस. पळशीकर, कुंदन सूर्यवंशी, श्रीमती के. एन.सिंघल, श्रीमती ए.एन.नेरपगार, श्रीमती सविता बारसाकडे, श्रीमती सुनंदा मिरकर, श्रीमती एस.बी.बडक, श्रीमती आर. एस वेळे, सागर भालके, रोहिदास म्हस्के यांचे योगदान आहे.