संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
शिरूर तालुक्यातील साहित्यिकांचा गुणगौरव सोहळा संपन्न
दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी -
महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शिरूर यांच्या वतीने शिरूर तालुक्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गीतकार व कवी हनुमंत चांदगुडे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव भोंडवे, गुलाबराव गवळे, तुकाराम बेनके, मारुती कदम, मयूर करंजे, जेष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे, अनिल पलांडे, संजय धुमाळ,
हे उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील बालकवींनी विविध विषयांवर बहारदार कविता सादर केल्या. यावेळी तालुकास्तरीय काव्य स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच कवी पांडुरंग बाणखिले, आकाश भोरडे, नानासाहेब गावडे, गिरीश खराबे यांनी देखील सामाजिक विषयांवर कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हनुमंत चांदगुडे यांनी कवी हा दुःख, हाल आणि वेदना सहन केल्यावर निर्माण होतो,असे मत व्यक्त केले.
यावेळी पुढील साहित्यिकांना साहित्य गौरव पुरस्कार 2024 ने सन्मानित केले.
मिनल साकोरे, केंदूर, राहुल शिंदे, मांडवगण फराटा, गिरीश खराबे, शिक्रापूर, विजय वनवे, कोरेगाव भीमा, संतोष फंड, बाभुळसर खुर्द, सिद्धी फराटे, मांडवगण फराटा, अनन्या चातुर, गणेगाव खालसा, तानाजी धरणे, आंबळे, डॉ. मिलिंद भोसुरे, गुरुवर्य स्वरुप संप्रदाय, कोमल गायकवाड, धानोरे, मीना म्हसे, पेरणे फाटा, डॉ. पांडुरंग बाणखेले, वडगाव रासाई, तेजस्विनी रुके, बुरुंजवाडी, साक्षी भंडारे, वढू बुद्रुक, पायल सोनवणे शिक्रापूर तसेच
विशेष शाळा सहभाग सन्मान
वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा यांचा करण्यात आला. पुस्तक गौरव पुरस्कार पुढील साहित्यिकांना देण्यात आले.मामाच्या मळ्यात सचिन बेंडभर पाटील, पारावरच्या गोष्टी शेखर फराटे,
लग्नाचा बार प्रा. कुंडलिक कदम, नक्षत्रांचे कवडसे, नानासाहेब गावडे,क्रांतिभूमी, विठ्ठल वळसे पाटील.
यावेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत मसापचे अध्यक्ष मनोहर परदेशी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कुंडलिक कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेंडभर यांनी केले. आभार प्रा. गुरुनाथ पाटील यांनी मानले.
यावेळी प्राचार्य संजीव मांढरे, अशोक दहिफळे, प्रवीणकुमार जगताप, नागनाथ शिंगाडे, शेखर फराटे, राहुल चातुर, विवेकानंद फंड, सुरज दरेकर, संभाजी चौधरी, स्वप्नील महाजन, आकाश भोरडे, शरद रणदिवे, विठ्ठल वळसे उपस्थित होते.