संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कन्नड येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
दखनी स्वराज्य, कन्नड, 26 जुलै 2024: येथील शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कन्नड यांनी कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीने साजरा केला. एनसीसी विभागाच्या कॅडेट्सनी परेड सादर केली आणि कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम केला.
देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या कारगिल वीरांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय भोसले यांनी आदरांजली वाहिली. त्यांनी कारगिल युद्धाचे महत्त्व आणि भारताच्या इतिहासावर त्याचा प्रभाव यावर भाष्य केले.
एनसीसी कॅडेट्सनी कारगिल युद्धावर विशेष वॉलपेपर तयार केले, ज्याचे उद्घाटन माननीय प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात NCC कॅडेट्ससाठी "सॅम बहादूर" चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग देखील दाखवण्यात आला
या समारंभास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बी.के. मगर, एनसीसी प्रमुख डॉ.व्ही.डी. मातकर, क्रीडा संचालक डॉ.यु.पी. डोंगरे, एनसीसी माजी विद्यार्थी श्री.सागर गुंजाळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.