संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
श्री संत सावता गुरुकुल विद्यालय, फुलंब्री येथे टिळक पुण्यतिथी व साठे जयंती साजरी
दखनी स्वराज्य, फुलंब्री : दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी श्री संत सावता गुरुकुल विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये आपल्या भाषणातून लोकमान्य टिळक तसेच शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रसंगाचे वर्णन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना उरणकर या होत्या तर प्रमुख वक्ते श्री प्रशांत मिसाळ हे होते. अध्यक्षा तसेच प्रमुख वक्त्यांनी लोकमान्य टिळक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सरस्वती ढाकणे यांनी केले तर आभार कु.भूमिका ढोके हिने व्यक्त केले. या सर्व कार्यक्रमासाठी गुरुकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.