संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
स्वयंसिद्ध प्रतिष्ठान तर्फे आषाढ काव्यधारा मैफिल
दखनी स्वराज्य, पिंपरी चिंचवड - स्वयंसिद्ध प्रतिष्ठान आयोजित आषाढ काव्यधारा मैफिलचे अध्यक्ष मा.राज अहेरराव संस्थेच्या अध्यक्षा सविता इंगळे उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे सर वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ कविवर्य डॉ पी.एस. अग्रवाल
प्रकाशिका प्रा.रूपाली अवचरे हे मान्यवर उपस्थित होते.
काव्य मैफिल सुरूवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले
प्रास्ताविकात नंदकुमार मुरडे म्हणाले स्वयंसिद्धा प्रतिष्ठान समाजात परिवर्तनाचे काम करते आत्मसन्मान देणारी संस्था असून महिलांना कराटे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत विविध क्षेत्रातील महिलांचा गुणगौरव कविसंमेलन समानतेचे काम करणारी एकमेव संस्था आहे असे अनेक उपक्रम राबविले जातात
पुढे म्हणाले समाज बिन चेहऱ्याला चेहरा देवू स्वयंदिशा स्वयंसिद्ध सिद्ध आहे.
संस्थेचे अध्यक्षा इंगळे म्हणाल्या साहित्य क्षेत्रात खारीचा वाटा असावा चर्चासत्र सामाजिक कार्य विचार देखणा असावा विचारांची संस्कृती जपत हुंडा निर्मूलन करत लघुउद्योजकांना पुरस्कार देवून गौरविण्यात येते महिला वर्गाला उत्कर्षासाठी पाठबळ देत आम्ही पाच पांडव खंबीरपणे कार्य करीत आहोत .
अनेक संस्थांनी कवीचा सन्मान मानपत्र सन्मानचिन्ह देवून करतात पण आमच्या संस्थेचे आधार स्तंभ डॉ पी एस अग्रवाल सरांनी नवीन पायंडा जन्माला घातला असून आजपासून साहित्यिकांचा सत्कारात फुल ना फुलाची पाकळी म्हणून मानधन देवून सन्मानित करण्यात येणार आहे असे प्रतिपादन केले
मान्यवर निमंत्रित कवी साधना शेळके जयश्री श्रीखंडे आत्मराम हारे निवेदक रानकवी जगदीप वनशिव सीमा गांधी फुलवंती जगताप कविराज विजय सातपुते हेमंत जोशी भिडेवाडाकार विजय वडवेराव मानसी चिटणीस शोभा जोशी जयश्री श्रोत्रिय योगिता पाखले दीपेश सुराणा अशा कवी कवयत्रीनी आपल्या रचना सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले कवीचे स्वागत टाळ्यांच्या गजरात करण्यात आले
विविध क्षेत्रातील मान्यवर दिलास शब्दधन संस्थेचे अध्यक्ष कवी सुरेश कंक सुभाष चव्हाण राजू जाधव जितेंद्र राय अशोक गायकवाड सुहास घुमरे कैलास बहिरट रजनी अहेरराव प्रकाशक नितीन हिरवे हरिष मोरे शरद काणेकर हे मान्यवर रसिक म्हणून हजर होते त्यांचा गुलाब पुष्प देवून त्यांना सन्मानित करण्यात आले कवी कवयत्रीना मानधनाचे पाकीट देवून गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात राज आहेरराव म्हणाले कवितेच्या प्रेमात पडलो तेव्हा पासून मी लोखंड कापणारा कामगार माणूस शब्द जपणारा झाला पुस्तकांचे पारायण केले कविता गादीवर बसून नाही मातीवर लिहिली पाहिजे कवी संतांचा वारसदार आहे आजच्या आषाढी काव्यधारा मैफिलीत अल्हाददायक नवरसात चिं करणारे कवी ओथंबलेल्या भावना शृंगाररस गुज पण कविता संदेश देणारी असावी.कविता जगणे महत्वाचे विरोध संघर्ष रोष सहन करत कविता जगली पाहिजे चांगल्या कवितांची नोंद इतिहासांत मांडली जाते
सहज सोपे नसते यशाचे शिखर सर करणे
मित्रांनो एवढे सोपे नसते मनात घर करणे
असा आशावाद राज अहेरराव यांनी व्यक्त केला.
या आषाढ काव्यधारा मैफिलचे सूत्रसंचालन प्रा दिनेश भोसले यांनी आपल्या बहारदार दमदार मृदूल आवाजातील गझला गीते चारोळ्या शेर शायरी सादर करून कवीची रसिकांच्या मनात घर केले ओघावत्या शैलीत सूत्रसंचालन व आभार मानले
पिंपरी चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये आषाढी काव्यधारा काव्य मैफिल संपन्न झाली