संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
तंबाखुजन्य पदार्थ उत्पादन नियंत्रण कायदा अंमलबजावणीसाठी*
संयुक्त कारवाई आवश्यक- पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ उत्पादन कायदा (२००३) जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीसस्टेशनस्तरावर महिन्यातून एक दिवस संयुक्त कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिले.
सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ उत्पादन कायदा (२००३) जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गठित समितीची आज पोलीस आयुक्त कार्यालय येथे बैठक घेण्यात आली.
बैठकीस वैद्यकीय अधिकारी जितेंद्र डोंगरे, पोलीस उपाधीक्षक (ग्रामीण) प्रकाश चौगुले, सहाय्यक आयुक्त(अन्न व औषध प्रशासन) अजित मैत्रे, वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका डॉ. सुनील पाटील, माहिती अधिकारी डॉ.मीरा ढास, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.लक्ष्मी पिसरे आदी समिती सदस्यांची उपस्थिती होती.
कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन,पोलीस प्रशासन व आरोग्य विभामार्फत संयुक्त कार्यवाही केली तर तंबाखूजन्य उत्पादनावर नियंत्रण आणण्यासाठी साहाय्य होईल. स्थानीक पोलीस प्रशासनामार्फत कायद्याचे उल्लंघन होत असलेल्या ठिकाणी विशेष कारवाई करण्यात यावी, असे निर्देश स्वामी यांनी दिले.
०००००