Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

दुर्गामाता नवरात्र उत्सवात कु. साक्षी ताई शिंदे हीच सुंदर किर्तन

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 08 October 2024 09:39 PM

दुर्गामाता नवरात्र उत्सवात कु. साक्षी ताई शिंदे हीच सुंदर किर्तन 



 (दै. दखनी स्वराज्य / माऊली दोबोले)


घुंगर्डे हादगाव : दुर्गा माता नवरात्र उत्सव घुंगर्डे हादगाव येथे माऊली वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी कु.साक्षी ताई शिंदे ईना आपुलीया हिता जो असे जागता! धन्य माता पिता तयाचिया या अभंगावरती खुप सुंदर असे कीर्तन करून श्रोत्यांचे मन जिंकले. कु. साक्षीने एक वर्षांपूर्वी माऊली शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला होता एका वर्षामध्ये खूप सुंदर पद्धतीने ती कीर्तन करायची शिकली आहे यामागे माऊली शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प. भागवत महाराज दोबोले यांचे पण खूप परिश्रम आहेत. या संस्थेमध्ये गेल्या पाच वर्षांपासून 80 मुली व मुल शिकत आहेत. व ते चांगल्या पद्धतीने घडले आहेत. वारकरी शिक्षण संस्था म्हणजे संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या विचारांवर आधारित अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था. या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण दिली जाते. त्यात भजन, कीर्तन, प्रवचन, शास्त्रीय शिक्षण, तसेच परंपरागत आणि नैतिक शिक्षण दिले जाते. साक्षीचे वडील कांता शिंदे हे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे प्रशिक्षक आहेत त्यामुळे साक्षीला लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. शिंदे यांचा मुलगा पण पैठण येथे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत आहे. शिंदे यांनी त्यांचे मुलगा व मुलगी दोन्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकून एक आदर्श निर्माण केला आहे. कारण आजकाल प्रत्येक जण मोठमोठ्या इंग्लिश स्कूलमध्ये आपले मुलं शिकवीत आहेत. परंतु आज मुलांना शिक्षणाबरोबर अध्यात्माची पण गरज आहे. कमी वयामध्ये साक्षीने खूप सुंदर असे कीर्तन केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .



प्रतिक्रिया 

मुलांना शिक्षणा बरोबर अध्यात्मिक ज्ञान देणे खूप महत्त्वाचे आहे कारण त्यातून त्यांच्यात मूल्यांची जाणीव, नैतिकता, आणि मानसिक स्थैर्य निर्माण होते. अध्यात्मिक शिक्षणामुळे मुलांना जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, तसेच ते शांत, समाधानी आणि आत्मविश्वासपूर्ण होतात. आमच्या माऊली शिक्षण संस्थेमध्ये 80 मुल व मुली शिक्षण घेतात. तसेच जे अनाथ बेघर मुल मुली आहे आशा मुला मुलींना ही संस्था शंभर टक्के मोफत राहणे, तीन वेळ जेवन, शिक्षण, कपडे ,मोफत पुरवते.


*ह.भ.प. भागवताचार्य भागवत महाराज दोबोले*
 संस्थापक अध्यक्ष माऊली वारकरी शिक्षण संस्था घुंगर्डे हादगाव