Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

त्रितपपुर्ती दत्तयाग यज्ञ सोहळ्याच्या पाचव्या दिवशी ह.भ.प शेषनारायण महाराज काकडे यांची कीर्तन सेवा

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

त्रितपपुर्ती दत्तयाग यज्ञ सोहळ्याच्या पाचव्या दिवशी ह.भ.प शेषनारायण महाराज काकडे यांची कीर्तन सेवा


* गोदावरी नदीच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आव्हान


(दखनी स्वराज्य, पैठण)

पैठण ह.भ.प. गुरुवर्य वै. ब्रह्मचारी भानुनंद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि श्री नवनाथ, सिद्धेश्वर महाराज, गोदेश्वर महादेव, तारकेश्वर महादेव, मलिकेश्वर महादेव कृपेने, 35 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन बाहेरील नाथ महाराज समाधी मंदिरात केले जाते. यावर्षी 36 वे वर्ष आहे. आज पाचव्या दिवशी कीर्तन सेवेत संत तुकाराम महाराज वारकरी संस्था पैठणचे प्रमुख ह.भ.प. शेषनारायण महाराज काकडे यांचे कीर्तन संपन्न झाले. संत निळोबारायाचा अभंग धन्य गोदातीर, धन्य प्रतिष्ठान, धन्य तेथील जनरहिवासी या अभंगाचे निरूपण करताना पैठण हे फक्त तीर्थक्षेत्र नसून ते श्रीक्षेत्र पैठण आहे. तीर्थ आणि श्री क्षेत्र यातील फरक समजावून सांगताना नाथ महाराजांचे विविध दृष्टांत सांगत भाविकांना मंत्रमुग्ध केले. भागवत पारायण ने सर्व दोषाचा नाश होतो. भक्ती शास्त्रात पारायण सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा मानली जात असल्याचेही याप्रसंगी सांगितले. जे प्रतिष्ठेने महानआहे ते प्रतिष्ठान असा पैठणचा महिमा सांगत नदी शुद्ध व स्वच्छ राहिली नाही. परंतु ती अपवित्र नाही आणि कधीच नव्हते त्यामुळे गोदावरीच्या स्वच्छतेकडे भाविक भक्ताने लक्ष द्यावे असे आव्हान कीर्तन सेवेच्या माध्यमातून केले. नामस्मरण हे तप आहे जेथून पंचांग शास्त्राची सुरुवात झाली ते पैठणचा महिमा सांगताना संत ज्ञानेश्वर यांनी रेड्यामुखी वेद बोलवले ते तीर्थक्षेत्राचे नाव पैठण आहे. असेही त्यांनी सांगितले या सप्ताहाचे कार्यक्रम ह.भ.प. नारायण महाराज आरबड यांच्या नेतृत्वात सुरू आहे. पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. ज्योतीराम महाराज घाडगे हे करत आहे. श्रीमंत पाटील तांबे, रघुनाथ पाटील चौधरी, शिवाजी महाराज सरडे, संजय महाराज काळे, गणेश महाराज शिंदे, फौजदार जाधव यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. भाविक भक्ताने कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावे असे आव्हान ह.भ.प. नारायण महाराज अडबड यांनी केले.