Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

उर्दू भाषेचा उगम खुलताबादेत - मसाप अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 07 January 2025 07:27 PM

उर्दू भाषेचा उगम खुलताबादेत - मसाप अध्यक्ष कौतिकराव  ठाले पाटील 


दैनिक दखनी स्वराज्य/ संदेश केरे


खुलताबाद येथे आज आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमिताने मराठी पत्रकार संघाने तर्फे अनुसया लॉनस् येथे मोठ्या उत्साहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, लोकशाही चा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचा उगम एकोणाविसाव्या शतकात झाला. विसाव्या शतकात  त्याचा विस्तार झाला.तर एकविसाव्या शतकात पत्रकारिता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पत्रकारिता तसेच लोकशाही टिकवण्यासाठी वर्तमानपत्रांनी निर्भीड पणे व निष्पक्षपणें काम केले पाहिजे केले. उर्दू भाषेचा उगम खुलताबाद येथे झाली असल्याची माहिती दिली.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी महासंघ पुणे संचालक गुलाबराव मगर, ज्येष्ठ समाजसेवक आबेद जहागीरदार, साईनाथ पाटील जाधव, गणी पटेल, राजेंद्र चव्हाण, प्राचार्य असिफ झकेरिया यांनी आपली मते व्यक्त केली.
दर्पण दिनानिमित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कुलकर्णी, देवदत्त कोठारे, सय्यद लाल, इसाक कुरेशी, विजय चौधरी, चांदखा पठाण यांच गौरव करण्यात आला.
यावेली खुलताबाद शहर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संखेने उपस्थीत होते.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवदत्त कोठारे, सूत्रसंचलन प्रा.शिवाजी गायकवाड व आभार दिनेश सावजी यांनी केले.