Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत कौशल्या विद्यालयाच्या पै.तृप्ती भवर हिने पटकावले सुवर्ण पदक

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 08 October 2025 07:18 AM

विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत कौशल्या विद्यालयाच्या पै.तृप्ती भवर हिने पटकावले सुवर्ण पदक


दखनी स्वराज्य, पैठण :


विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित कौशल्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाटेगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी आज दि. 07 ऑक्टोबर 2025 मंगळवार रोजी विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या विभागस्तरीय  कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.

वयोगट 19 वर्ष खालील- मुली
 
* वजनगट -72 किलो
* सुवर्णपदक
* प्रथम क्रमांक- पै.तृप्ती नारायण भवर

या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सचिव वाल्मिकराव सुरासे, उपाध्यक्ष विठ्ठल पैठणकर, कोषाध्यक्ष विशाल सुरासे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी तथा कुस्तीचे आंतरराष्ट्रीय कोच व पंच शरद कचरे, रेखा परदेशी, तालुका क्रीडा अधिकारी मुकुंल वाडकर, तालुका क्रीडा मार्गदर्शक डॉ. सोमनाथ टाक, लक्ष्मण सपकाळ, पै. नारायण भवर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश गायकवाड, स्वप्नील गव्हाणे, बालाजी नलभे, नंदकिशोर पातकळ, स्वप्नजा पाटील, विजय सपकाळ, सोन्याबापू पालवे, नारायण औटे, भाऊसाहेब गायकवाड, अमोल गायकवाड, प्रकाश कामडी, अनिता तारख, आकेश दांडेकर, प्रविण काळे, शितल धायगुडे,अस्मिता भिसे, अक्षय शेळके, ओंकार औटे, निखील पापुलवार, विठ्ठल त्रिभुवन, सतिष पवार, महेश गायकवाड सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.