संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
ता.25 (दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे बैठक फाउंडेशन यांजकडून विद्यार्थ्यांसाठी स्वरोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. यात गायन, वादन, नृत्य कलाविष्कार आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने भरतनाट्यम नृत्य प्रकाराने झाली. त्यानंतर शाळेतील यश नरवडे याने मन लागोरे लागोरे गुरु भजनी हा अभंग सादर केला. त्याला तबलावादक ज्ञानेश गायकवाड याने साथ दिली. तर अभिश्री करंजे हिने सुंदर भरतनाट्यम सादर केले. त्याला विद्यार्थ्यांनी टाळ्यांची दाद देत उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर दाक्षायणी आठल्ये, मंदार कारंजकर, तेजल कुलकर्णी यांनी आपल्या सुमधुर गायनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याला हार्मोनियम वादक लीलाधर चक्रदेव व तबलावादक ओंकार तोडकर यांनी सुंदर साथ दिली. तसेच नृत्य कलाकार अथर्व चौधरी यांनी भरतनाट्यम तर धनश्री जोगळेकर हिने कथक प्रकार सादर केला. उपस्थित रसिकांनी टाळ्यांची जोरदार दाद देत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळेचे शिल्पकार व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे, पालक भानुदास झोडगे, योगेश करडे, अविनाश ताठे, गणेश सावंत, संभाजी गोरडे, गुरुकुल शाळेचे मुख्याध्यापक हेमराज वारे आणि धनश्री वारे यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन व शिष्यवृत्ती तज्ञ विजय गोडसे, अरूणा घोडेकर, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरक काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, विद्या सपकाळ, वैशाली जगताप, गितांजली वाघोले आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते.
तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, उपाध्यक्ष मल्हारी वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाशकाका वाबळे, माजी उपसरपंच केशव वाबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष अंकुश वाबळे, सतिश वाबळे, सुरेखा वाबळे, सतिश कोठावळे, प्रकाश विठ्ठल वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी केले. स्वागत तुषार सिनलकर, प्रास्ताविक किरण अरगडे तर आभार पोपट दरंदले यांनी मानले.