Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

विज्ञान प्रदर्शनात गणोरी प्रशालेचा चौकार

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 12 December 2024 07:16 AM

 विज्ञान प्रदर्शनात गणोरी प्रशालेचा चौकार

▪️ ग्लिसरीनच्या मदतीने नारळ पेटवून हवन करत झाले उद्घाटन
▪️ दीप  प्रज्वलनात स्पिरिटने पेटवली मॅग्नेशियमची फीत
▪️ आंतरराष्ट्रीय संशोधक श्री सुदर्शन लोया यांची उपस्थिती ठरली लक्षणीय
▪️ खरेखूरे ताजे हृदय, किडनी, जठर, स्वादुपिंड, लहानआतडे, मोठे आतडे, डोळे हाताळण्याची साधली संधी!!

(दखनी स्वराज्य, फुलंब्री) : 

52 व्या फुलंब्री तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गणोरी प्रशालेने पारितोषिकांचा चौकार फटकावला आहे. माध्यमिक, प्राथमिक आणि दिव्याग गटात परितोषिक मिळवून विद्यार्थी जिल्हा स्तरासाठी पात्र ठरले आहेत. प्राथमिक गटातून कु.शिवानी उबाळे आणि कु.गायत्री शेळके या विद्यार्थ्यांचे होलोग्रामने तालुक्यात दुसऱ्या क्रमांक मिळवला. माध्यमिक गटातून ओम गणेश लहाने आणि सचिन मैद यांचे शेतीचे धान्य आणि वाळवायचे कपडे ओले न होऊ देणारे संवेदक तिसरे आले. दिव्यांग विद्यार्थी गटातून प्राथमिक विभागात कू दक्षिणी चंद्रे हिचे अतिरिक्त पाण्याचे व्यवस्थापन सुचक यंत्र  पहिले आणि प्राथमिक गटातून कू आरती भादवे हिचे पर्यावरण पूरकधूप पहिल्या क्रमांकावर येऊन जिल्हास्तरासाठी पात्र ठरले. गणोरी येथील जि.प.प्रशालेत झालेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक श्री सुदर्शन लोया यांच्या हस्ते गणितज्ञ् श्री नीलकंठ लोसरवाड यांच्या अध्यक्षतेखाली, तर सरपंच श्रीमती सरलाताई संतोष पाटील तांदळे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास गायकवाड, विस्तार अधिकारी श्रो.के एम व्यवहारे, केंद्रप्रमुख श्री पंडित भोसले, समन्व्यक श्री कैलास चिरखे, श्री पोपट भगत, विकास सोसायटीचे उपाध्यक्ष संतोष पाटील तांदळे यांच्यासह श्रीमती सीमाताई राजू उबाळे, पालक प्रतिनिधी अशोक सोनवणे, गणेश जाधव, विलास सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक अनिल देशमुख, समन्व्यक श्रीमती एस. एम. देशमुख, अरविंद राजहंस व सहकाऱ्यानी केले. प्रशालेच्या यशस्वी विद्यार्थ्यांना  विज्ञान शिक्षक अनिल देशमुख, विज्ञान विभाग प्रमुख एस.डी.नाईकवाडे, श्रीमती ए. एन.नेरपगार आणि श्रीमती एस. के. बारसागडे  यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रदर्शनात तालुक्यातील 89 शाळाचे 120 पेक्षा जास्त प्रयोग प्रदर्शित करण्यात आले होते.
  स्पर्धेच्या व्यतिरिक्त सहभागी झालेल्या प्रयोगात गणोरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्राण्यांचे ह खरे अवयव हृदय, किडनी, जठर, स्वादुपिंड, अन्नपिशवी, प्रजनन संस्था, डोळे यांचे प्रदर्शन करत उपस्थितांना अचंबित केले. पारंपरिक दीप प्रज्वलन पद्धती ऐवजी या समारंभात स्पिरिटच्या दिव्याने मॅग्नेशियमची फित जाळून दीप प्रज्वलन करण्यात आले, तर प्रदर्शनाचे उद्घाटन तुपाच्या सहाय्याने अंधश्रद्धा निर्मूलनचा प्रयोग करत नारळ पेटवून उद्घाटन झाले. संयोजक मुख्याध्यापक आणि सहकाऱ्यांनी दाखवलेल्या  या वैज्ञानिक दृष्टीच्या औचित्याचे उपस्थितांनी कौतुक केले.