Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करुन न्याय द्या - कॉ. किशोर ढमाले

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 03 October 2025 05:58 AM

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करुन न्याय द्या - कॉ. किशोर ढमाले


दै.दखनी स्वराज्य वृत्तसेवा


कन्नड(अरुण थोरात): आदिवासी कष्टकरी या देशाचा मुळ मालक आहे. परंतू त्यालाच आपल्या न्याय हक्कांसाठी झगडावे लागतेय हे दुर्दैव आहे. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करुण गोर गरिब आदिवासी, कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांना न्याय द्या अशी मागणी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे राज्यसंघटक कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केली आहे. ते कन्नड येथे आयोजित आदिवासी जनआक्रोश मोर्चा प्रसंगी बोलत होते. यावेळी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वन हक्कांची मान्यता अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारीत नियम 2012 व पंचायत विस्तार पेसा अधिनिय 1996 ची योग्य रितीने अंमलबजावणी करुण हक्काचा सातबारा द्या. आदिवासींचे हक्क संपविणारे वन विधेयक 2023 तात्काळ रद्द करा. दि.07 डिसेंबर 2023 रोजी नंदूरबार ते मुंबई पायी बिढार महामोर्चास मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनांची ताबडतोब अंमलबजावणी करा. पेसा 17 संवर्ग पद भरती कला, क्रिडा, संगणक शिक्षकांना तात्काळ नियुक्त करा. क्रिमीलेयर अनुसूचित जाती जमाती च्या विरोधातला निर्णय रद्द करा. पेडकवाडी ता. कन्नड येथील मयत रावजी भावराव मेंगाळ यांचे वारस सुखराम मेंगाळ यांच्या वर वनविभागा कडून झालेल्या अन्याय अत्याचार ची चौकशी करुण संबंधिताला तात्काळ भरपाई द्या, यांसह वनहक्क दावेदारांच्या जमीन मोजणी, मालकी हक्काचा सातबारा, पिएम किसान, पिकविमा, विहिर बांधणी अनुदान, टैक्टर ल यंत्रांद्वारे शेती मशागतीस परवानगी, संपुर्ण शेतकरी कर्ज माफी,  एस.टी प्रवर्गातून आरक्षणात घुसखोरी थांबवा, धुळे नंदुरबार जिल्ह्यात मेंढपाळां कडून होणारा उपद्रव थांबवा, आदी मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी पवन सोनवणे, गौताळा ठाकर समाज संस्थेचे अध्यक्ष पांडू कडाळे, मा. पंस. सभापती खेमा मधे,   सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. रावजी पथवे,  तालुकाध्यक्ष रतन मधे, परशुराम सोनवणे, बाळासाहेब बरडे, सुनील ठाकरे, गंगाराम आगीवले, सत्यशोधक सभेचे जयराम पथवे, बाळू मेंगाळ, दिनकर दाभाडे, बुधा गावंडे, शामू गांगड, कैलास पालोदकर, वच्छालाबाई वाघ, बुधाबाई पोकळे, नमाबाई भुतांबरे, सिताबाई पथवे, रेखाबाई मेंगाळ, कमळाबाई उघडे, राहीबाई वाजे, झिपा मधे, गोविंद थोरात, भावराव मधे, सुखराम मेंगाळ, राघू मेंगाळ, भावलाल जाधव, प्रल्हाद जाधव, विजय थोरात, दिपक गुंजेकर, सरिचंद राठोड, बाळू थोरात आदींसह शेकडो आदिवासी, सत्यशोधक कार्यकर्ते उपस्थित होते.