संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने श्री. विनय आनंदराव महाले यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. श्री. विनय महाले यांनी विवेकानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ. आर. जी. दोरीक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता. त्यांनी आपल्या संशोधन प्रबंधामध्ये "कॅरेक्टरायझेशन स्टडीज ऑफ सम नॅनोक्रिस्टलिन सबस्टिट्यूटेड स्पिनेल फेराइट सिस्टिम्स" {"Characterization Studies of Some Nanocrystalline Substituted Spinel Ferrite Systems"} याविषयावर संशोधनात्मक अभ्यास केला त्यासाठी विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवी बहाल केली आहे.या संशोधन कार्यात प्रो. डॉ. के. एम. जाधव, माजी विभाग प्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विनय महाले हे कन्नड तालुक्यातील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. के. महाले साहेब {औराळकर} यांचे चिरंजीव आहेत. या यशाबद्दल विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव श्रीमंतराव शिसोदे, प्रचार्य डॉ. दादाराव शेंगुळे, डॉ.रुपेश मोरे यांनी अभिनंदन केले. तसेच विविध स्तरांतील मान्यवरांकडून शुभेच्छा मिळत आहेत.