Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

विद्यार्थ्यांच्या स्व-विकासास चालना देणे गरजेचे - सौ.अमृता भुमरे यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 30 May 2025 09:58 PM

विद्यार्थ्यांच्या स्व-विकासास चालना देणे गरजेचे - सौ.अमृता भुमरे यांचे प्रतिपादन

दखनी स्वराज्य वृत्तसेवा 

 पैठण- पैठण येथील विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित "आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक प्रशिक्षण शिबिर 2025" आयोजित केलेले असून 30 मे रोजी पाचव्या दिवशीच्या सत्रात "NEP 2020 बदलता अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक व समाजाचे योगदान" या विषयावर बोलताना उपक्रमशील शिक्षिका सौ. अमृता भुमरे यांनी शिक्षण व गुणवत्ता मधील फरक समजून सांगत NEP 2020 चा बदलता अभ्यासक्रम केवळ ज्ञानावर भर न देता विद्यार्थ्याने अवगत केलेल्या ज्ञानाचे उपयोजन करता आले पाहिजे. त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे, हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे असे सांगितले. समानता व समता यामधील फरक समजून सांगत पुस्तक हे शिकवण्याचे साधन असून त्या साधनाचा उपयोग करत शिक्षकांनी व्यवहार ज्ञानाची ओळख करून देणे गरजेचे आहे. सक्सेस चे महत्व सांगताना विद्यार्थी स्वतःहून शिकण्यास प्रेरित झाल्याशिवाय सक्सेस मिळणार नाही. त्यामुळे NEP 2020 नुसार शिक्षकांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत विद्यार्थ्याला स्वतःहून शिकण्यास प्रेरित करून त्याचे प्रश्न विचारण्याचे कौशल्य विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये सामूहिक चर्चा घडवून आणत संभाषण कौशल्याचा विकास करणे गरजेचे आहे.  समग्र मूल्यमापन प्रगती पुस्तकाविषयी माहिती देत समग्र मूल्यमापन हे विद्यार्थ्याचे मित्र, पालक, समाज, यांची मदत घेत करणे गरजेचे आहे, हे सोदाहरण समजावून सांगितले. 
 या सत्राचे प्रास्ताविक पी. बी. पातकळ यांनी केले. पाहुण्याचा परिचय सोनाली गोरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल मुंढे  यांनी केले. तर प्रिया गुडदे यांनी आभार  मानले. शिबिरास विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संतोष पा. तांबे, उपाध्यक्ष विशाल तांबे आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य आर. बी. रामावत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एम. के कोळगे, तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दिनांक 26- 5- 2025 ते 5- 6- 2025 असे दहा दिवसाचे सदर शिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.