Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

व्याख्याते डॉ. संजय गायकवाड यांना पाच मानाचे पुरस्कार

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 02 May 2025 07:25 AM

व्याख्याते डॉ. संजय गायकवाड यांना पाच मानाचे पुरस्कार


दै.दखनी स्वराज्य वृत्तसेवा


कन्नड (अरुण थोरात): महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे आयोजित केलेल्या 'दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती' व 'नवोपक्रम स्पर्धा' यांचा नुकताच निकाल जाहीर झाला. या स्पर्धेत पिशोर ता. कन्नड येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे अध्यापक, साहित्यिक व व्याख्याते प्रा. डॉ. संजय गायकवाड हे उल्लेखनीय यश संपादन करत एकूण पाच पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. डॉ. गायकवाड यांना जिल्हास्तरावर इंग्रजी विषयासाठी प्रथम व द्वितीय पुरस्कार तसेच तालुकास्तरावरही प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाले. याशिवाय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हास्तरावर त्यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भारतरत्न मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात विजय त्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. सान्वी देशमुख व डॉ. प्रकाश मांटे यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली.
डॉ. गायकवाड यांना यापूर्वी ही महाराष्ट्र शासनाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार व राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती पुरस्कार मिळाले आहेत. सत्कारास उत्तर देताना त्यांनी सांगितले, “शिक्षकाने मनापासून, झोकून देऊन काम केले तर त्याचे फळ विद्यार्थ्यांच्या यशात प्रतिबिंबित होते. वर्गातील विद्यार्थी हे आपलेच मूल असल्याच्या भावनेने शिकवले पाहिजे, हीच माझी शिकवण्यामागची प्रेरणा आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.