संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
विद्युत महामंडळाचे पैठण येथील सहायक अभियंता रोहित तायडे यांना निरोप
दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था पैठण -
एम.एस.ई.बी.चे सहायक अभियंता श्री रोहित तायडे साहेब आणि उपव्यवसथापक श्री तुषार भोसले साहेब यांना त्यांचा पैठण येथील कार्यकाळ संपून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी एम.एस.ई.बी.कर्मचारी संघटनेच्या वतीने हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. दोन्हीही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी पैठण मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामधे दैनिक दखनी स्वराज्यचे संपादक संतोष तांबे, आयकॉन पॅराडाईज ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर.बी. रामावत, मा.नगरसेवक ईश्वर दगडे, मा.नगरसेवक सोमनाथ भारतवाले, मा.नगरसेवक अजीम कटियारे, पांडुरंग धांडे, श्री रावस, श्री आगळे आदी उपस्थित होते.