संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
विज्ञान मेळाव्यात जिल्हा परिषद प्रशाला तुर्काबाद खराडी जिल्ह्यात अव्वल विभाग स्तरावर निवड
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2024 या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजी नगर येथे आज दिनांक 12/08 2024 रोजी करण्यात आलेले होते. मेळाव्याचा विषय होता कृत्रिम बुद्धिमत्ता संभाव्यता आणि आव्हाने या स्पर्धेमध्ये प्रत्येक तालुक्यातून प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावलेल्या एकूण 21 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात जिल्हा परिषद प्रशाला तुर्काबाद खराडी या प्रशालेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी युवराज गोरख दिवटे यांने विज्ञान शिक्षक अमरसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मधील शहरी आणि ग्रामीण या विद्यार्थ्यातून प्रथम क्रमांक घेत बाजी मारली व विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली. या स्पर्धेमध्ये प्रशाला तुर्काबादचा इतिहास गौरवशाली राहिलेला आहे. मागील सलग दोन वर्ष या स्पर्धेत प्रशाला राज्यस्तरावर गेलेली असून विज्ञान प्रदर्शनांमध्येही या प्रशालेने गतवर्षी राज्यावर शाळेचे नेतृत्व केले होते. यावर्षीही या प्रशालेने यशाची परंपरा कायम राखत आपला संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक कायम ठेवला. या यशाबद्दल विदयार्थी युवराज गोरख दिवटे व मार्गदर्शक अमरसिंह चंदेल व तांत्रिक सहाय्य करणारे आयसीटीचे मोहन सोलनकर यांचे अभिनंदन प्रशालेचे मुख्याध्यापक सुदाम गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन नाडे, उपाध्यक्ष वैशाली तोडकर व सर्व सदस्य तसेच प्रशालेतील शिक्षक किशोर निकुंभ, बापू कोठावदे, सोपान चव्हाण, निवेदिता ठाकूर, शिल्पा चौधरी, आशा चौधरी, रंजना सोळुंके, संगीता फिरके, विवेक येवले ,सोनाली जाधव, मोहन सोलनकर, मिलिंद व्हावळे, वैशाली सावंत, ऐश्वर्य साखरे, अमित रोकडे, योगेश दवंगे व समस्त ग्रामस्थांनी अभिनंदनचा वर्षाव केला.